ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली जुन्नर तालुक्यातील ‘सुवर्ण पेढी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली 
जुन्नर तालुक्यातील ‘सुवर्ण पेढी’
ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली जुन्नर तालुक्यातील ‘सुवर्ण पेढी’

ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली जुन्नर तालुक्यातील ‘सुवर्ण पेढी’

sakal_logo
By

घटस्थापनेपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या ‘सकाळ महोत्सव’, ‘आनंदाचा दसरा, बक्षिसांची दिवाळी’ या योजनेत जुन्नर व नारायणगाव येथील ४२ वर्षांची परंपरा असलेल्या ‘पूनम ज्वेलर्स’ या विश्वसनीय सुवर्णपेढीने यावर्षीही सहभाग घेतला आहे. सणासुदीच्या हंगामात आपल्या ग्राहकांना बक्षीसे जिंकण्याची उपलब्ध करून दिली आहे. त्यात कारपासून ब्लू टूथ स्पीकरपर्यंत अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.
चोख व्यवहार व विश्वासहार्यता ही ‘पूनम ज्वेलर्स’ची जमेची बाजू आहे. याचबरोबर शासनाने वेळोवेळी बनविलेले नियम व कायदे स्वीकारत आपल्या व्यवसायात त्यांची अंमलबजावणी करत ग्राहकांना सेवा देण्याचा पेढीच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मधुकर पांडुरंग काजळे यांनी सुवर्ण कारागिरीच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू केला. त्यांनी गेली ४२ वर्षे सतत परिश्रम करत व्यवसाय भरभराटीला आणला. कारागिरीनंतर सराफी ज्वेलर्स आणि आता कंपनीच्या माध्यमातून हा व्यवसाय ते पुढे नेत आहेत. अनेक पिढ्यापासून खानदानी असलेला त्यांचा हा व्यवसाय आहे. ग्राहकांनी प्रमाणित ‘एचयूआयडी’प्रमाणे हॉलमार्किंग आणि वजन व बिलासह दागिने घ्यावेत. प्रत्येक दागिन्यावर व पावतीवर एचयूआयडी नंबर पाहूनच दागिने घ्यावेत, असा आग्रह पेढीच्या मालकांचा असतो. सामाजिक व आर्थिक बांधिलकीच्या माध्यमातून अनेक उपक्रम सातत्याने राबविले जातात.
काजळे यांनी ४२ वर्षाच्या अखंड वाटचालीनंतर आता दुसऱ्या पिढीकडे कामकाज सोपवण्यात आले आहे. शुभम मधुकर काजळे व पूनम मधुकर काजळे हे अत्यंत व्यवस्थितपणे पेढीचे कामकाज सांभाळत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांना सुवर्णपेढी व्यवसायातील पूर्ण ज्ञान असल्याने तसेच मित्रपरिवार व असंख्य ग्राहकांची साथ असल्याने व्यवसायाला मूर्त रूप प्राप्त झाले आहे. सुवर्णपेढीची पुढील वाटचाल पूनम गोल्ड अँड सिल्वर डिझाइनर कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे.
‘‘आमच्या दोनही दुकानात चांदी व सोन्यातील सर्व प्रकारच्या देवदेवतांचे दागिने, नवग्रहांच्या अंगठ्या, नवनवीन डिझाईनच्या कलात्मक चांदी पायल जोडी, आकर्षक पेंडल व टॉप्स मोती व खड्यांच्या आकर्षक नथा विविध प्रकारच्या फुल्या, चांदीचे पैंजण, बिचवे, ताट, ताम्हण, वाट्या, फुलपात्र, नवीन पद्धतीचे डोरले, नेकलेस, राणीहार, गंठण अंगठी, पेंडल, माळ, चेन आदी उपलब्ध आहेत. तसेच, आपल्या आवडीप्रमाणे सोन्या-चांदीचे दागिने बनवून दिले जातील. त्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्यावी, अशी सुवर्ण पेढी आहे,’’ असे काजळे यांनी सांगितले.