बंदी घातलेल्या कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदी घातलेल्या कीटकनाशकांची
विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा
बंदी घातलेल्या कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा

बंदी घातलेल्या कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा

sakal_logo
By

जुन्नर, ता. १ : उत्पादन व विक्रीस बंदी घातलेल्या कीटकनाशकांचा विनापरवाना बेकायदेशीर साठा करून ती शेतकऱ्यांना विकणाऱ्या दोघांविरुद्ध जुन्नर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
जुन्नर तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी नीलेश प्रकाश बुधवंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नगर जिल्ह्यातील बापूसाहेब उत्तमराव उगले (रा. डोंगरगाव, ता. अकोले) व रवींद्र बबन देशमाने (रा. धांदरफळ ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध कीटकनाशक कायदा, कीटकनाशक नियम तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.
कृषी अधिकाऱ्यांना जुन्नर येथील एसटी बसस्थानकाजवळ शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी गाडीत कीटकनाशके ठेवून त्यांची शेतकऱ्यांना विक्री करताना दोघे आढळून आले. त्यांच्याकडे कीटकनाशकांची नोंदणी, उगम प्रमाणपत्र, उत्पादन व विक्री परवाना नसल्याचे चौकशीत आढळून आले. शासन व शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक करत असल्याचे दिसून असल्याने त्यांच्या विरुद्ध सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद बुधवंत यांनी दिली आहे. त्यांच्याकडे बंदी घातलेली सुमारे दोन लाख ५४ हजार २९० रुपये किमतीची कीटकनाशके आढळून आली आहेत.