जुन्नरला स्त्री रोग निदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला स्त्री रोग निदान शिबिर
जुन्नरला स्त्री रोग निदान शिबिर

जुन्नरला स्त्री रोग निदान शिबिर

sakal_logo
By

जुन्नर, ता. ३ : येथील कल्याण पेठ तरुण मित्र मंडळाने दुर्गामाता नवरात्र उत्सवानिमित्त मोफत स्त्री रोग निदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ७६ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर डॉ. शेखरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
डॉ. हेमलता शेखरे यांनी शिबिराचे उद्‍घाटन केले. यावेळी ऋषाली घोलप, सारिका खराडे, रत्नमाला वाईकर, शर्मिला बुट्टे, आश्विनी मलठनकर, सुलभा गोरे, अंकिता गोसावी आदी महिला उपस्थित होत्या. मंडळाचे अध्यक्ष मयूर खराडे, कार्याध्यक्ष नरेंद्र वाईकर, सेक्रेटरी रोहन मिसाळ यांनी शिबिराचे संयोजन केले. विनायक गोसावी यांनी आभार मानले.