''बंदी असणारी कीटकनाशके विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''बंदी असणारी कीटकनाशके विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार''
''बंदी असणारी कीटकनाशके विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार''

''बंदी असणारी कीटकनाशके विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार''

sakal_logo
By

जुन्नर, ता. ४ : "बंदी असलेल्या कीटकनाशकांची खरेदी करून ती शेतकऱ्यांना विकण्याऱ्या विक्रेत्यावर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल,'''' असा इशारा जुन्नर तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा बी-बियाणे, खते व औषधे गुण नियंत्रण अधिकारी नीलेश प्रकाश बुधवंत यांनी दिला आहे.
जुन्नर येथे नगर जिल्ह्यातील दोघे बंदी घातलेल्या कीटकनाशकांची सार्वजनिक ठिकाणी टेम्पोतून विक्री करताना आढळून आले. त्यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडील सुमारे दोन लाख ५४ हजार २९० रुपये किमतीची कीटकनाशके जप्त केली आहेत.
ज्याअर्थी लोक अशा प्रकारची बंदी असलेली कीटकनाशके घेऊन विक्रीसाठी आणतात त्याअर्थी तालुक्यातील काही विक्रेते सदरची औषधे खरेदी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यापुढे बंदी असलेली कीटकनाशकांची खरेदी करून ती शेतकऱ्यांना विकणाऱ्या तालुक्यातील विक्रेत्यावर अधिक गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी देखील बंदी असलेल्या कीटकनाशकांची खरेदी करू नये तसेच जी औषधे दुकानदाराकडून खरेदी करतो त्याची बिल न चुकता संबंधित दुकानदारांकडून घ्यावीत.याबाबत शेतकऱ्यांना काही शंका असल्यास त्यांनी कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन बुधवंत यांनी केले आहे.