अक्षय बोऱ्हाडे याला ‘ससून’मध्ये हलवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय बोऱ्हाडे याला 
‘ससून’मध्ये हलवले
अक्षय बोऱ्हाडे याला ‘ससून’मध्ये हलवले

अक्षय बोऱ्हाडे याला ‘ससून’मध्ये हलवले

sakal_logo
By

जुन्नर, ता. ६ : खुनी हल्ल्यातील आरोपी अक्षय मोहन बोऱ्हाडे याला वैद्यकीय तपासणीसाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता उलटी झाल्याने पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने अक्षय व त्याचेच्या दोन साथीदारांना जुन्नर न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश झाल्याने येरवडा कारागृहात नेण्यापूर्वी ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे त्यास उलटी झाल्याने प्राथमिक उपचारानंतर ससून रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. पोलिसांनी नारायणगाव येथे एका खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार केले. तेथील उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर झाली असून, पुढील उपचाराकरिता ससून रुग्णालयात दाखल केले. शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील आरोपी अक्षय मोहन बोऱ्हाडे व त्याचे साथीदार सुदर्शन शिवाजी विधाटे व विजय प्रकाश बोचरे यांना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर पोलिसांच्या पथकाने खेडशिवापूर येथे गुरुवारी (ता. २९) ताब्यात घेतले होते.