जुन्नरला गरजूंना रोटरीकडून दिवाळी फराळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला गरजूंना रोटरीकडून दिवाळी फराळ
जुन्नरला गरजूंना रोटरीकडून दिवाळी फराळ

जुन्नरला गरजूंना रोटरीकडून दिवाळी फराळ

sakal_logo
By

जुन्नर, ता. २३ : रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्यावतीने दीपावली निमित्त फराळ वाटप केले. दिवाळी फराळ वाटप उपक्रमांतर्गत लाडू, चिवडा फराळाचे पदार्थ व पणत्या देवून रोटरी क्लबने गरजूंची दिवाळी गोड केली.
यावेळी जुन्नर शहरातील जुन्नर बॉईज होम अनाथालयातील विद्यार्थी, पंचलिंग वसाहत व रोकडे मारुती वसाहतीमधील आबाल वृद्धांना दिवाळी भेट दिली असल्याची माहिती अध्यक्ष अतुल परदेशी यांनी दिली.
यावेळी महिला बाल कल्याण विभागाचे अक्षय साळुंके, अधिक्षक सुहास शिरसाट, रोटरीचे आजी माजी पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.