शासकीय कामात अडथळाप्रकरणी राजूरच्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कामात अडथळाप्रकरणी
राजूरच्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा
शासकीय कामात अडथळाप्रकरणी राजूरच्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

शासकीय कामात अडथळाप्रकरणी राजूरच्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By

जुन्नर, ता. २३ : शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून राजूर नंबर दोन (ता. जुन्नर) येथील पती व पत्नीच्या विरोधात जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वनपाल अशोक शंकर फलके (रा. आमोंडी, ता. आंबेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्नर पोलिसांनी शीतल योगेश मुरकुटे व योगेश युवराज मुरकुटे (दोघे रा. राजूर नंबर दोन, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी राजूर येथील वन विभागाच्या गट नंबर २४१ ची मोजणी करत असताना वनपाल फलके यांना मुरकुटे दांपत्याने शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करून धक्काबुक्की केली, तसेच सरकारी काम करत असताना अडथळा आणला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विकास जाधव करत आहेत.
----------------
------------------------------------