शेतातील रस्त्याच्या वादातून परस्परविरोधी तक्रारी दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतातील रस्त्याच्या वादातून 
परस्परविरोधी तक्रारी दाखल
शेतातील रस्त्याच्या वादातून परस्परविरोधी तक्रारी दाखल

शेतातील रस्त्याच्या वादातून परस्परविरोधी तक्रारी दाखल

sakal_logo
By

जुन्नर, ता. २ : आदिवासी भागातील घंगाळदरे (ता. जुन्नर) येथे शेतातील रस्त्याच्या कारणावरून मारहाणप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्याने पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
घंगाळदरे येथील दत्तात्रेय चंद्रकांत तळपे (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना मारहाण करणाऱ्या दत्तात्रेय सोमा रावते, सोमा संजय रावते, कोंडीभाऊ गोविंद रावते, निखिल कोंडीभाऊ रावते, सुमन कोंडीभाऊ रावते, सुंदराबाई दत्तात्रेय रावते, सागर कोंडीभाऊ रावते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोंडीभाऊ गोविंद रावते यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांना बाळू तळपे व दत्ता तळपे व मनीषा तळपे यांनी व पुतण्या संजय यास राहुल तळपे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी दत्तू चंद्रकांत तळपे, बाळू चंद्रकांत तळपे, राहुल दत्तात्रेय तळपे व मनीषा दत्तू तळपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, सहायक फौजदार घाडगे हे पुढील तपास करत आहेत.