शुद्ध पाणी पुरवठ्याची गोद्रेच्या महिलांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुद्ध पाणी पुरवठ्याची 
गोद्रेच्या महिलांची मागणी
शुद्ध पाणी पुरवठ्याची गोद्रेच्या महिलांची मागणी

शुद्ध पाणी पुरवठ्याची गोद्रेच्या महिलांची मागणी

sakal_logo
By

जुन्नर, ता. ७ : गोद्रे (ता. जुन्नर) येथे शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी किसान सभा महिला गाव समितीच्या वतीने करण्यात आली.
गोद्रे गावातील उतळेवाडी येथील सार्वजनिक विहीरीवर जाळी नसल्याने हवेने आजूबाजूच्या परिसरातील कचरा विहिरीत जातो व पाणी दूषित होते. त्यामुळे ग्रामस्थांना वारंवार साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. विहिरीवर त्वरित लोखंडी जाळी व शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी ग्रामसेवक एस. जी. ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे महिलांनी केली. त्याचबरोबर १५ डिसेंबरपर्यंत कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या वेळी किसान सभा महिला गाव समितीच्या अध्यक्षा प्रियांका उतळे, सचिव सोनाली सुरकुले, उपाध्यक्षा कमल उतळे, सदस्या सुनीता उतळे, लता उतळे, ग्रामपंचायत सदस्या दीपाली उतळे उपस्थित होत्या.