जुन्नरमधील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमधील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
जुन्नरमधील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

जुन्नरमधील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

sakal_logo
By

जुन्नर, ता. १० : जुन्नर तालुक्यातील ऑक्टोबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुदत संपणाऱ्या १५ व नव्याने स्थापित झालेल्या २ अशा एकूण १७ ग्रामपंचायतींचा यात समावेश असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.

तालुक्यातील मुदत संपणाऱ्या काळवाडी, सोमतवाडी, सावरगाव, साकोरी तर्फे बेल्हे, अणे, पारगाव तर्फे आळे, सुलतानपूर, बोतार्डे, आंबे, हातवीज, वानेवाडी, भिवाडे खुर्द, काले व शिंदे या १५ ग्रामपंचायती तसेच झापवाडी व विठ्ठलवाडी (येणेरे) या दोन नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे.

या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची नोटीस शुक्रवारी (ता. १८) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागविण्याचा व सादर करण्यासाठी सोमवार (ता. २८) ते शुक्रवार (ता. २ डिसेंबर) मुदत असून उमेदवारी अर्जांची छाननी ५ डिसेंबर, चिन्हवाटप व अंतिम यादी प्रसिद्धी ७ डिसेंबर, मतदान १८ डिसेंबर व मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.