भेसळयुक्त गहू बियाणे विक्रीप्रकरणी पितापुत्राविरुद्ध फसवणूक गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भेसळयुक्त गहू बियाणे विक्रीप्रकरणी पितापुत्राविरुद्ध फसवणूक गुन्हा दाखल
भेसळयुक्त गहू बियाणे विक्रीप्रकरणी पितापुत्राविरुद्ध फसवणूक गुन्हा दाखल

भेसळयुक्त गहू बियाणे विक्रीप्रकरणी पितापुत्राविरुद्ध फसवणूक गुन्हा दाखल

sakal_logo
By

जुन्नर,ता.१८ : भेसळयुक्त गहू बियाणे विक्री प्रकरणी पितापुत्राविरुद्ध गुरुवारी (ता.१७) जुन्नर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
येणेरे (ता.जुन्नर) येथील शेतकरी सुशांत ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तसेच कृषी विभागाने पांडव शेती भांडारचे शेखर पांडव व आशिष शेखर पांडव दोघेही (रा. जुन्नर) यांचे विरुद्ध कारवाई केली आहे. ढोले व त्यांचे मित्र बाबूराव घोगरे गुरुवारी सकाळी शेतीसाठी लागणारे बी बियाणे व खत घेण्यासाठी पांडव शेती भांडार या दुकानात गेले होते. पांडव यांच्याकडे अंकुर केदार या जातीचे गहू बियाणे मागितले. यावेळी त्यांनी अंकुर केदार नावाचे गव्हाचे पंधरा किलो बियाणे दुसऱ्या कोणत्यातरी जातीच्या गव्हाचे पिशवीमध्ये दिल्याने शंका आल्याने त्यांनी येथील किसान ॲग्रोवन दुकानांत जाऊन अंकुर केदार जातीच्या गव्हाच्या बियाणे बाबत खात्री केली असता त्यांना घेतलेल्या गहू बियाण्यात भेसळ असल्याचे समजले. याबाबत पांडव यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडीचे उत्तरे दिली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक पवार पुढील तपास करत आहे.
कृषी विभागाची कारवाई पांडव कृषी सेवा केंद्राचे तीनही परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिली. बोगस बियाणे बाबत पांडव कृषी उद्योग दुकानाची सखोल तपासणी केली असता सात अनधिकृत गोडाऊन आढळून आले. या गोडाऊन मध्ये सुमारे ९५ मेट्रिक टन खताचा साठा तसेच ५७.६९ क्विंटल बियाणे साठा सील करण्यात आला आहे.
दुकानात उपलब्ध असलेल्या बियाणे साठ्या मधून गहू पिकाचे अंकुर केदार, कोहिनूर एचडी २१८९ व हरबरा पिकाचे कोहिनूर दिग्विजय या वाणाचे तीन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पांडव कृषी उद्योग यांना पुढील आदेशापर्यंत विक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे, प्रमोद खांडगे पाटील, संजय भुजबळ,अजित नाना वालझडे यांनी याप्रकरणी कृषी विभागाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.