जुन्नरला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू
जुन्नरला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू

जुन्नरला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू

sakal_logo
By

जुन्नर, ता. २३ : येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. उजागरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी केंद्राचे उद्‍घाटन केले. या वेळी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर संवाद आयोजित केला होता. जावळे यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका तसेच विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर-गैरवापर याबाबत माहिती दिली.
शासनाच्या विविध पदांवर कार्यरत असणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पंकज चौधर, अमित गवळी, वैभव ठाकूर, दीपक घोरपडे यांनी दुसऱ्या सत्रात विविध स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासक्रम यांविषयी मार्गदर्शन केले.
संस्था अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. बी. वाघमारे, प्रा. विक्रम रसाळ, प्रा. रेश्मा विधाटे, प्रा. सोनिया डावरे व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा.डॉ.अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शरयू वाजगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. धनश्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कुणाल वानखेडे यांनी आभार मानले.