गोळेगावला विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोळेगावला विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा
गोळेगावला विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा

गोळेगावला विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा

sakal_logo
By

जुन्नर,ता.२८ : गोळेगाव (ता. जुन्नर) येथे विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक मोहन नाडेकर यांनी भारतीय संविधान निर्मिती मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, तसेच भारतीय संविधानाविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांची संविधान विषयावर भाषणे झाली. जुन्नर तालुका पंचायत समितीचे वतीने चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. गट शिक्षणाधिकारी संचिता अभंग, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी डुंबरे, रघुनाथ पवार, केंद्र प्रमुख दादाभाऊ भांगे, दुंदा भालिंगे, निवृत्ती बांगर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे नियोजन शिक्षक दत्तात्रेय उगले, उमेश शिंदे, किरण पवार, मारुती साबळे यांनी केले. स्पर्धेतील पहिले चार विद्यार्थी पुढील प्रमाणे : वक्तृत्व स्पर्धा : आदिती शिंदे, कावेरी शिंदे, वेदिका थोरात, शुभ्रा बिडवई. चित्रकला स्पर्धा : कावेरी शिंदे, सई वाणी, वेदिका थोरात, सार्थक शिंदे. संविधान दिनाच्या कार्यक्रमात न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश प्रताप सपकाळ व गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव केला.