बोगस आदिवासींविरोधात जुन्नरला संघटनांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस आदिवासींविरोधात
जुन्नरला संघटनांचे आंदोलन
बोगस आदिवासींविरोधात जुन्नरला संघटनांचे आंदोलन

बोगस आदिवासींविरोधात जुन्नरला संघटनांचे आंदोलन

sakal_logo
By

जुन्नर, ता. २ : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या संघटनांनी बोगस आदिवासींना संरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करून निषेध केला.
जुन्नर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘बोगस हटवा, आदिवासी वाचवा’, ‘आदिवासींची विशेष भरती झालीच पाहिजे’ आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी एसएफआय तालुका सचिव अक्षय घोडे, किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, डॉ. मंगेश मांडवे, डॉ. गोविंद गारे विचार मंच प्रमुख राजू शेळके, तसेच सचिन साबळे, सुवर्णा साबळे, अक्षय गारे, दादाभाऊ साबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ‘डीवायएफआय’चे तालुका सचिव गणपत घोडे व ‘एसएफआय’चे जिल्हा सहसचिव प्रवीण गवारी यांची भाषणे झाली. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आदिवासी असल्याचे खोटे कागदपत्र सादर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवण्याबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे. राज्य सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.