Mon, Jan 30, 2023

मोफत आरोग्य तपासणीस प्रतिसाद
मोफत आरोग्य तपासणीस प्रतिसाद
Published on : 4 December 2022, 11:37 am
जुन्नर, ता. ४ : येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शंभरहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात रुग्णांची मधुमेह व रक्तदाब तपासणी, तसेच ईसीजी काढण्यात आला. राजेंद्र पवार यांच्या स्मरणार्थ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
येथील तुळजाभवानी हॉस्पिटल व लायन्स क्लबच्या सहकार्याने शुक्रवार (ता. २) रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मधुमेह व उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना डॉ. अक्षय शेवाळे यांनी याबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची शहरातून आरोग्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुनील शेवाळे, डॉ. लुकेश खोत, डॉ. नारायण राठोड, मनोज भळगट, मिलिंद झगडे, प्रकाश रासने, धोंडूपंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते.
------------------------------------