लेण्याद्री लेणी येथील दत्तात्रेयांचे पेशवेकालीन भित्तीचित्र अंधारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेण्याद्री लेणी येथील दत्तात्रेयांचे 
पेशवेकालीन भित्तीचित्र अंधारात
लेण्याद्री लेणी येथील दत्तात्रेयांचे पेशवेकालीन भित्तीचित्र अंधारात

लेण्याद्री लेणी येथील दत्तात्रेयांचे पेशवेकालीन भित्तीचित्र अंधारात

sakal_logo
By

जुन्नर, ता. ७ : श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील गणेश लेणीतील दत्तात्रेयांचे पेशवेकालीन भित्तीचित्र अजूनही अंधारातच असल्याची खंत इतिहासप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पेशवेकालीन चित्रशैलीतील अनमोल अशा ऐतिहासिक ठेव्याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
पुरातत्त्व विभागाने या भित्तिचित्रांचे संवर्धन करून लेण्याद्रीला येणाऱ्या पर्यटक तसेच, अभ्यासकांना भिंतीवरील ही चित्रशैली पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी केली. जुन्नरपासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लेण्याद्री डोंगरातील लेणी क्रमांक सातमध्ये पेशवेकालीन चित्रशैलीच्या चित्रकाराने दत्तात्रेयांचे चित्र चित्रित केले आहे. चित्रशैलीच्या डाव्या बाजूला धोतर परिधान केलेल्या पुरुषाच्या उजव्या हातात दत्तात्रेयांच्या दिशेने वर केलेले पात्र दिसत असून खांद्यावर उत्तरीय आहे. दोन्ही दर्शनी भागात दोन पुसट चित्रे असून कमानी नक्षी वेलींना पाने, फुले असलेल्या नक्षीचे रेखाकृती रंगकाम उठावदार आहे. या भित्तीचित्रांना सध्या तडे पडून पापुद्रे निघत चित्रशैली विद्रूप होण्याच्या मार्गावर आहे.

JUN22B04671