लेण्याद्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जितेंद्र बिडवई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेण्याद्री गणपती देवस्थानच्या
अध्यक्षपदी जितेंद्र बिडवई
लेण्याद्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जितेंद्र बिडवई

लेण्याद्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जितेंद्र बिडवई

sakal_logo
By

जुन्नर, ता. ७ : श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी जितेंद्र चंद्रकांत बिडवई व सचिवपदी शंकर लक्ष्मण ताम्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रविवारी (ता. ४) झालेल्या देवस्थानच्या मासिक सभेत ही निवड करण्यात आली.

बिडवई यापूर्वी देवस्थानच्या सचिव पदावर कार्यरत होते, तसेच जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे सचिव, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक, शिवकार्य अर्बन मल्टिपल निधी संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. राज्य शासनाच्या वतीने त्यांना कृषिनिष्ठ व कृषिभूषण पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले आहे.

ताम्हाणे देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष असून, गेली २३ वर्षे अध्यक्षपदाचे व ६ वर्षे सचिव पदाचे काम त्यांनी पाहिले आहे.

देवस्थानच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे मावळते अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, कैलास लोखंडे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, विजय वऱ्हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, भगवान हांडे आणि कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई उपस्थित होते.

जुन्नर तालुका पर्यटन तालुका जाहीर झाला आहे, त्यामुळे निसर्ग पर्यटनासोबतच धार्मिक पर्यटन वाढीसाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा निर्माण करून देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.
----------------------------------
सोबत फोटो बिडवई व ताम्हाणे
------------------------------------