Sun, Feb 5, 2023

पाडळी स्वागत कमानीला ‘शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार’ नावाची मागणी
पाडळी स्वागत कमानीला ‘शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार’ नावाची मागणी
Published on : 16 December 2022, 9:12 am
जुन्नर, ता. १६ : पाडळी (ता. जुन्नर) येथे नव्याने बांधत असलेल्या स्वागत कमानीला "स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार" असे नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने केली आहे.
शहाजीराजे भोसले यांचा बलशाली पराक्रम तसेच जुन्नर या परगण्यावर असणारे त्यांचे विशेष प्रेम इतिहासातल्या अनेक घटनांतून पुढे येत असल्याने स्वागत कमानीस त्यांचे नाव देण्याची मागणीचे निवेदन आमदार, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, सरपंच यांना देण्यात आले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे ऋषिकेश वाजगे, गौतम डावखर, सौरभ ढवळे, स्वप्नील चंदनशीव, अशोक खडका आदी कार्यकर्ते उपस्थित होते.