
जुन्नर येथील शिवछत्रपती महाविद्यालयाचा संशोधन प्रकल्प स्पर्धेसाठी पात्र
जुन्नर, ता. १२ : येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थिनी झैनाब सय्यद हिने पुणे येथील विभागस्तरीय आविष्कार स्पर्धेत पदवी गटातून सादर केलेल्या "पर्यावरणपूरक पेपर निर्मिती" हा संशोधन प्रकल्प विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण सहा गटांतील १७ संशोधन प्रकल्पांची निवड विभागस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी केली होती. महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाची विद्यार्थिनी झैनाब सय्यद हिने डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालय आकुर्डी पुणे येथे झालेल्या विभागस्तरीय (झोनल लेव्हल) आविष्कार स्पर्धेत "पर्यावरणपूरक पेपर निर्मिती" या संशोधन प्रकल्प सादर केला होता. हा संशोधन प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणाऱ्या "विद्यापीठस्तरीय आविष्कार" स्पर्धेत सादर करण्यात येणार आहे. अध्यक्ष ॲड. संजय काळे तसेच विश्वस्त, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ.डी.व्ही.उजगरे, उपप्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे व प्राध्यापकांनी झैनाब सय्यद हीचे अभिनंदन केले.