फळपिक विमा योजनेचा लाभ घ्या : खेडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फळपिक विमा योजनेचा लाभ घ्या : खेडकर
फळपिक विमा योजनेचा लाभ घ्या : खेडकर

फळपिक विमा योजनेचा लाभ घ्या : खेडकर

sakal_logo
By

जुन्नर, ता.१३ : जुन्नर तालुक्यातील आंबा व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका समन्वयक नंदकिशोर खेडकर यांनी केले आहे.
आंबिया बहार २०२२ मधील आंबा या फळ पीक योजनेसाठी ३१ डिसेंबर २२ व डाळिंब फळ पिकासाठी १४ जानेवारी २०२३ अशी अंतिम मुदत आहे. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी जुन्नर मध्ये रथ फिरवून जनजागृती करण्यात आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १ ते ७ डिसेंबर २२ या कालावधीत जुन्नर तालुक्यात चौथा पीक विमा सप्ताह साजरा करण्यात आला. भारतीय कृषी विमा कंपनी व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर पंचायत समिती कार्यालयात फसल बिमा सप्ताह उपक्रमाच्या प्रचार प्रसिद्धी रथाचा प्रारंभ आमदार अतुल बेनके, तहसीलदार रवींद्र सबनिस, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, मंडल कृषी अधिकारी दत्तात्रेय जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी नीलेश बुधवंत, अमर फडतरे, अनुराधा म्हसे, लक्ष्मण झांजे, आत्मा समन्वयक विरणक, भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका समन्वयक नंदकिशोर खेडकर, कर्मचारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.