
जुन्नर वकील बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. अरुण गाडेकर
जुन्नर, ता. १६ : येथील जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीमध्ये एकूण १९७ मतदारांपैकी १८७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये अध्यक्ष पदासाठी ॲड. अरुण गाडेकर १०१ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड. हेमंत भास्कर यांना ८४ मते मिळाली तर दोन मते बाद झाली.
विजयी पदाधिकारी व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष दोन जागांसाठी ॲड. सचिन चव्हाण (१५१) ॲड. संदीप जगताप (१५१). ॲड. रोहिणी गाडेकर यांना (६९). सेक्रेटरी- ॲड. गणेश भालेराव (बिनविरोध). सहसेक्रेटरी-(महिला राखीव) ॲड. भाग्यश्री शिंदे-नलावडे (बिनविरोध). खजिनदार- ॲड. शरीफ कोयते (बिनविरोध). ग्रंथपाल- ॲड. सुनीता चासकर (बिनविरोध). ऑडिटर- ॲड. संजय उंडे (१३८) मते मिळवून विजयी तर, ॲड. शमीम इनामदार यांना (३६) मते मिळाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. गणेश अल्हाट, ॲड. लक्ष्मी घुटे, ॲड. अभिषेक पानसरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. कृष्णकांत ढमढेरे, ॲड. शरद गुरव, ॲड. ज्योती भगत-शिंदे यांनी काम पाहिले.