जुन्नर येथे शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर येथे शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन
जुन्नर येथे शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन

जुन्नर येथे शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन

sakal_logo
By

जुन्नर, ता. २६ : येथे कृषी विभाग, आत्मा व लुपीन फौंडेशनच्यावतीने शेतकरी दिनाचे निमित्ताने शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करून शेतकरी दिन साजरा केला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना जुन्नर तालुका पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी सचिन राहणे यांनी स्वच्छ गोठा व जनावरांच्या लंपी रोगाविषयी मार्गदर्शन केले. तसेच, शाश्वत फार्मींगचे शिवाजी कांबळे यांनी जमिनीची उत्पादकता वाढवणे व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी टेन ड्रम थेअरीचे महत्त्व, आत्माचे व्यवस्थापक सूर्यकांत विरणक यांनी शेती जोड व्यवसाय व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेची माहिती, मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रेय जाधव यांनी कृषी विभागाच्या विविध योजना अशा विविध विषयांची माहिती यावेळी दिली.


यावेळी लुपीन मार्फत शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले तसेच, उत्कृष्ट शेतकऱ्यांना सन्मानित केले. कार्यक्रमाचे संयोजन लुपीन फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.