जुन्नर तालुक्यात कोव्हीड लसीकरणाला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर तालुक्यात कोव्हीड लसीकरणाला वेग
जुन्नर तालुक्यात कोव्हीड लसीकरणाला वेग

जुन्नर तालुक्यात कोव्हीड लसीकरणाला वेग

sakal_logo
By

जुन्नर,ता. २९ : चीन व इतर देशातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने जुन्नर तालुक्यात मधल्या काळात मंदावलेल्या कोव्हीड लसीकरणाला पुन्हा वेग आला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोव्हीड प्रतिबंधक कोवॅक्सिन लसीची मात्रा उपलब्ध असून कोविशील्ड लसीची मागणी केल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी सांगितले.
आळे, आपटाळे, बेल्हे, इंगळूण, मढ, निमगावसावा, ओतूर, पिंपळवंडी, राजुरी, सावरगाव, वारूळवाडी, येणेरे या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा आहे. तसेच जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केले जाते.
तालुक्यात एकूण सहा लाख १६ हजार १९२ नागरिकांनी लस घेतली आहे. यात तीन लाख ७ हजार ७१ जणांनी पहिला, दोन लाख ७६ हजार ४७८ जणांनी दुसरा, तर ४२ हजार ६४३ जणांनी बूस्टर डोस घेतलेला आहे. कोविशील्ड व कोवॅक्सिन लसीचा पहिला, दुसरा व बूस्टर डोस दिला आहे. तर कॉर्बेवॅक्सचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.
अद्याप ४६ हजार ९८८ जणांनी बूस्टर डोस घेतला नसून यात ४२ हजार ९५५ नागरिक, तर २ हजार ७३० फ्रंटलाइन व १ हजार ३१३ हेल्थ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुसरा डोस २८ हजार ८४६ जणांनी घेतलेला नाही. यात २८ हजार ६०५ नागरिक, तर १६८ फ्रंटलाइन व २५ हेल्थ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.