Mon, Jan 30, 2023

जुन्नर येथे अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार
जुन्नर येथे अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार
Published on : 29 December 2022, 10:44 am
जुन्नर, ता. २९ : जुन्नर येथील एका आदिवासी अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने राहत्या घरातून मंगळवारी (ता.२७) सकाळी फूस लाऊन पळवून नेले. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी जुन्नर पोलिसांत दाखल केली. ही मुलगी मध्यम बांध्याची असून मराठी हिंदी भाषा बोलते. तिची उंची पाच फूट, रंग निमगोरा, चेहरा गोल, अंगात हिरवा टॉप, काळी लेगीज व गुलाबी स्वेटर घातलेला आहे. जुन्नर पोलिस पुढील तपास करत आहेत.