हॉटेल पार्किंगच्या पैशावरून  
घाटघरला परस्परविरोधी तक्रारी

हॉटेल पार्किंगच्या पैशावरून घाटघरला परस्परविरोधी तक्रारी

जुन्नर, ता. ९ : घाटघर (ता. जुन्नर) येथील एका हॉटेलच्या पार्किंगच्या पावतीच्या पैशाचे कारणावरून जुन्नर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
हॉटेल चालक गणेश बबन सांगडे, सुनीता गणेश सांगडे व कल्याणी देवाडे (पूर्ण नाव माहीत नाही) (सर्व रा. धालेवाडीतर्फे मिन्हेर, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद प्राजक्ता बबन शेळकंदे (रा. साईनाथ नगर, पिंपळे गुरव; मूळ रा. चावंड, ता. जुन्नर) यांनी दिली आहे. शिवीगाळ व मारहाण करणे तसेच आदिवासी समाजाचे असल्याचे माहीत असतानाही मुद्दाम हिणवुन जबरदस्तीने माफी मागण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार कलम तसेच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे तपास करत आहेत.
दरम्यान, सुनीता गणेश सांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी प्राजक्ता बबन शेळकंदे,अक्षदा यमा शेळकंदे, स्वाती सखाराम शेळकंदे, नितीन जीवन शेळकंदे, शशिकांत मारुती माळी यांच्याविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून, शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण करणे, सोन्याचे मंगळसूत्र तोडून घेऊन गेले, विनयभंग करणे, आदी कारणावरून गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com