शिवजयंतीच्या निमित्ताने जुन्नरच्या वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंतीच्या निमित्ताने जुन्नरच्या वाहतुकीत बदल
शिवजयंतीच्या निमित्ताने जुन्नरच्या वाहतुकीत बदल

शिवजयंतीच्या निमित्ताने जुन्नरच्या वाहतुकीत बदल

sakal_logo
By

जुन्नर, ता. १७ : येथील शिवजयंती निमित्ताने शिवनेरीवर येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी शनिवार (ता. १८) सकाळी ८ व रविवार (ता. १९) रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जुन्नर शहर व परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे.
शिवनेरी किल्ला व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आदेश जारी केले आहेत. नारायणगावाहून जुन्नरकडे येणारी वाहने घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालय-धामणखेल रस्त्याने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड पार्किंग येथे जातील व ही वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारूळवाडी, नारायणगांव मार्गे जातील.
शिवनेरीकडे गणेशखिंड, बनकफाटा, ओतूर यामार्गे येणारी वाहने मुंढे हायस्कूल व आसपासचे परिसरात असलेल्या पार्किंग वाहनतळावर लावावीत व पुन्हा त्यामार्गे कल्याण, नगर, नाशिक मार्गे जातील. आपटाळे, सोमतवाडी (ता. जुन्नर) कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरून ताथेड पार्किंग येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील.