प्रवासी महिलेच्या बांगडीची जुन्नर बसस्थानकातून चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवासी महिलेच्या बांगडीची
जुन्नर बसस्थानकातून चोरी
प्रवासी महिलेच्या बांगडीची जुन्नर बसस्थानकातून चोरी

प्रवासी महिलेच्या बांगडीची जुन्नर बसस्थानकातून चोरी

sakal_logo
By

जुन्नर, ता. २६ : येथील एसटी बसस्थानकात प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची एक तोळे वजनाची ५० हजार रुपये किमतीची बांगडी चोरट्याने लांबविली. याबाबत लीला संतोष फलके (रा. त्रिमूर्ती कॉलनी, प्लॉट नं. ए ४४ नवी सांगवी) यांनी जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या उजव्या हातातील नक्षीदार बांगडी अज्ञात व्यक्तीने कापून चोरून नेली. याबाबत पोलिस निरीक्षक नारायण पवार हे अधिक तपास करत आहेत.