शिवनेरीवर तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवनेरीवर तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम
शिवनेरीवर तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम

शिवनेरीवर तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम

sakal_logo
By

जुन्नर, ता. ७ : किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने शिवनेरी स्मारक समिती व सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्यावतीने तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


यामध्ये बुधवारी (ता. ८) शिवनेरीवरील शिवजन्मस्थानी दीपोत्सव, गुरुवारी (ता. ९) सकाळी गड प्रदक्षिणा आयोजित केली आहे तर शुक्रवार (ता. १०) सकाळी शिवाई मातेस अभिषेक, छबिना व पालखी मिरवणूक, शिवजन्म सोहळा, ध्वजारोहण व शिव वंदना, पोवाडे व धर्मसभा आयोजित केली आहे.


यावेळी राजमाता जिजाऊ पुरस्कार, तसेच किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण व सायंकाळी जुन्नर शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी विक्रमसिंह जयवंतराव बाजी मोहिते, ब्रिगेडियर प्रसाद जोशी, शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंतराजे मावळे आदी मान्यवर उपस्थित होते.