वल्लभ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमित परदेशी

वल्लभ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमित परदेशी

जुन्नर, ता. ८ : येथील वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमित परदेशी व उपाध्यक्षपदी नितीन गांधी यांची बिनविरोध निवड झाली.
या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. पतसंस्थेचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे- उत्तम घुले, दत्तात्रेय म्हस्के, तुषार लाहोरकर, बिहारीलाल परदेशी, सुहास चिखले, नरेंद्र कासार, उज्वला शेवाळे, वैष्णवी चतुर, सखाराम कडलक, लक्ष्मीकांत कुंभार, राजेंद्र जुंदरे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी काम पाहिले. माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या संस्थेच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. संचालकांच्या अकरा जागांसाठी ३९ जणांनी अर्ज दाखल केले होते. आमदार अतुल बेनके, युवा नेते अमित बेनके यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com