माणिकडोह आयटीआयमधील महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणिकडोह आयटीआयमधील महिलांचा सन्मान
माणिकडोह आयटीआयमधील महिलांचा सन्मान

माणिकडोह आयटीआयमधील महिलांचा सन्मान

sakal_logo
By

जुन्नर, ता. १० : माणिकडोह (ता. जुन्नर) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांचा शिंडलर कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख अर्पिता सिंग यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान केला. संस्थेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेतील कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी या वेळी उपस्थित होते. प्राचार्य दत्तात्रेय जगताप, गटनिदेशक अशोक टेके, महिला शिक्षिका दीपाली हांडे-कुलकर्णी, स्वाती भैरट, कल्याणी बांबळे यांची भाषणे झाली. वैष्णवी ढेकणे यांनी सूत्रसंचालन केले.