
मुस्लिम वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद
जुन्नर, ता.१२ : येथील कादरिया वेल्फेर सोसायटीने आयोजित केलेल्या मुस्लिम समाजातील वधु-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद मिळाला. यावेळी सुमारे ४०० इच्छुक मुस्लिम युवक युवती व पालक उपस्थित होते. यापैकी ३० वधू-वरांचा १० मे रोजी सामुदायिक सोहळ्यात विवाह होणार असल्याचे अध्यक्ष रऊफ खान यांनी सांगितले.
वधु-वर मेळाव्यासाठी मुस्लिम महिला मंचाचे सहकार्य लाभले.
यावेळी पुणे, मुबई, कल्याण, नगर येथील इच्छुक वधू-वर व पालक सहभागी झाले होते. सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी वधूला संसार उपयोगी वस्तू मोफत देण्यात येतात.
जुन्नर नगर पालिकेच्या जागेवर तत्कालीन पालकमंत्री अजित पवार याच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून एक कोटी रुपये खर्चाचे मुस्लिम सांस्कृतिक भवन बांधले आहे. येथे विवाह सोहळा होणार आहे. आमदार अतुल बेनके यांनी सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये दिले आहेत तर संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांना निशाणे कादरीया सन्मान देण्यात येणार असल्याचे खान यांनी सांगितले.
परिचय मेळाव्याचे आयोजन सईद पटेल, मुबीन शेख, फिरोज पठाण, रौफ खान, इकबाल बेग, अजीम तिरंदाज, सलीम पटेल, मनूभाई पिरजादे, जहीर इनामदार, जावेद सय्यद, जरार कुरेशी, ॲड. सलमा सय्यद, परवीन मोमीन, सिमी शेख, हजरा इनामदार, फोजिया इनामदार आदींनी केले होते.