जुन्नर येथे महिलांसाठी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर येथे महिलांसाठी कार्यशाळा
जुन्नर येथे महिलांसाठी कार्यशाळा

जुन्नर येथे महिलांसाठी कार्यशाळा

sakal_logo
By

जुन्नर, ता. १८ : येथे लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशनच्यावतीने महिलांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी शबरी विकास मंडळाच्या शाखा प्रबंधक सविता चकवे यांनी महिला दिनाचा इतिहास व महत्त्व, महिलांचा संघर्ष व सक्षमीकरणाची सद्यःस्थिती यावर मार्गदर्शन केले. डॉ.शीतल शिंदे यांनी महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली.

महिला पोलिस हवालदार मनीषा ताम्हाणे यांनी महिलांची सुरक्षाबाबत पोलिस दलाकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजना सांगितल्या. पोलिस नाईक आडवाल यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती सांगितली. कृषी विज्ञान केंद्राच्या निवेदिता शेटे यांनी आहारात पौष्टिक तृणधान्यांची असणारी गरज याविषयी माहिती दिली. लुपिन फाउंडेशनचे प्रताप मोटे यांनी तालुक्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी कौशल्य विकास योजने अंतर्गत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३१ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या विविध कार्यक्रमातून प्रशिक्षण घेऊन उपजीविका विकास व नर्सिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आठ महिलांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक अंबादास चाळगे, बाळू बोराडे, संजय दिंधळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. झुंबर साबळे यांनी आभार मानले.