निमदरी येथे सख्ख्या भावांत शेतीच्या वादातून हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमदरी येथे सख्ख्या भावांत
शेतीच्या वादातून हाणामारी
निमदरी येथे सख्ख्या भावांत शेतीच्या वादातून हाणामारी

निमदरी येथे सख्ख्या भावांत शेतीच्या वादातून हाणामारी

sakal_logo
By

जुन्नर, ता. १० : शेतीच्या कारणावरून निमदरी- विकासवाडी (ता. जुन्नर) येथील दोघा सख्ख्या भावांत हाणामारी झाली. त्यांनी एकमेकांच्या विरोधात जुन्नर पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
नंदुलाल बन्सीराम परदेशी याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो शेतात असताना भाऊ सत्यवान बन्सीराम परदेशी व त्याची पत्नी गंगा हे ट्रॅक्टर घेऊन शेतात आले. यावेळी त्यास, ‘तू कोणाच्या परवानगीने ट्रॅक्टर शेतात घालतो?’ असे म्हटल्याने त्याला राग आला व त्याने ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर सत्यवान बन्सीराम परदेशी यांनी, आपण शेतात रोटर मारत असताना भाऊ नंदुलाल त्याची पत्नी ज्योती, वडील बन्सीलाल व आई सखूबाई यांनी रोटरहून खाली ओढून डोळ्यात मिरचीपूड टाकून, लाकूड तसेच बांबूची काठी व स्क्रू ड्रायव्हरने आम्हा पती-पत्नीस मारहाण करून जखमी केले, अशी तक्रार दिली आहे. ही घटना ७ एप्रिल सकाळी घडली असून, जुन्नर पोलिसांकडे ९ एप्रिल रोजी तक्रार दिली आहे.