Sun, Sept 24, 2023

पैसे भरून देतो सांगून
जुन्नरमध्ये फसवणूक
पैसे भरून देतो सांगून जुन्नरमध्ये फसवणूक
Published on : 27 April 2023, 8:26 am
जुन्नर, ता. २७ : कुसूर (ता. जुन्नर) येथील मनीषा बाळू दुराफे या शेतकरी महिलेची बँक ऑफ इंडियाच्या जुन्नर शाखेत एका अनोळखी व्यक्तीने ३९ हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले की, दुराफे या सोमवारी (ता. २४) बँकेत आल्या. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने, ‘तुम्हाला एटीएममध्ये पैसे भरून देतो,’ असे म्हणून त्यांच्याकडील ५०० रुपयांच्या एकूण ७८ नोटा हातचलाखीने काढून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.