सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यात अव्वल

सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यात अव्वल

जुन्नर, ता. ३० : सावरगाव (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा तालुका पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गट प्रवर्तक पूनम शिंदे-मनसुख व अमररापूर उपकेंद्रातील आशा कार्यकर्त्या रूपाली मांडलिक यांचा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक आला आहे. यामुळे सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यात अव्वल ठरले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख डॉ.भगवान पवार यांचे उपस्थितीमध्ये शनिवार (ता. २९) पुणे येथे ह्या पुरस्कार दिले. जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जाहिद जाफरी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे, आरोग्य सहाय्यक विजय दिवटे, सुनंदा पाचपुते, आरोग्य सेविका ज्योती कोळसे, गटप्रवर्तक पुनम शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com