Sun, Sept 24, 2023

शेतकऱ्याच्या विहिरीतील मोटारीची चोरी
शेतकऱ्याच्या विहिरीतील मोटारीची चोरी
Published on : 9 May 2023, 10:07 am
जुन्नर, ता. ९ : सुकाळवेढे-ढेगळेवाडी (ता. जुन्नर) येथून सुमारे २१ हजार रुपये किमतीची पाण्यातील मोटार अज्ञात चोरट्याने लांबविली. याबाबत नामदेव बाबूराव ढेंगळे यांनी जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ढेंगळेवाडी येथील (गट नंबर २६३) मधील विहिरीतून ही मोटार चोरी केल्याचे नमूद केले. जुन्नर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ५) ढेंगळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.