राजूर येथे मोफत आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजूर येथे मोफत आरोग्य शिबिर
राजूर येथे मोफत आरोग्य शिबिर

राजूर येथे मोफत आरोग्य शिबिर

sakal_logo
By

जुन्नर, ता. १३ : राजूर (ता. जुन्नर) येथील आयुष आरोग्यवर्धिनी केंद्राच्यावतीने मोफत आयुर्वेदिक अग्निकर्म व विद्घकर्म शिबिर आयोजित केले होते. या शिबीरात १५३ जणांवर मोफत उपचार केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप गोसावी यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांचे मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात अनेक वृद्धांच्या गुडघा, कंबर, मान दुखी तसेच सायटीका या आजाराने त्रस्त रुग्णावर उपचार केले. या शिबिरासाठी भोसरी-पुणे येथील निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले.

यावेळी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी लकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ. अनिल निघुट, अक्षय भाटी, डॉ. प्रदिप गोसावी, डॉ. नीलेश लोंढे, डॉ. सारिका लोंढे तसेच उपसरपंच शांताराम मुंढे, देवराम मुंढे, संदीप मुंढे आदी उपस्थित होते. या शिबिराला चाइल्ड फंड इंडिया संस्थेचे सहकार्य लाभले.