Sun, Sept 24, 2023

उच्छिल, शिवली येथे घरफोडी
उच्छिल, शिवली येथे घरफोडी
Published on : 16 May 2023, 3:34 am
जुन्नर, ता. १६ : आदिवासी भागातील उच्छिल व शिवली (ता. जुन्नर) येथे घरफोडीच्या दोन घटनांमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा सुमारे दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
उच्छिल येथील संगीता सुरेश ढेगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ व १४ मेदरम्यान त्यांच्या राहत्या घराचा बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील दीड लाख रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे दोन मंगळसूत्र, एक ग्रॅम वजनाचे सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी, तीनशे रुपये रोख, असा ऐवज चोरीस गेला.
शिवली येथील साधना संतोष डोळस यांच्या घरातून तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे १८ हजार रुपये किमतीचे कानातील वेल व १५ हजार रुपये, असा ऐवज चोरट्यांनी लांबविला. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी मंगळवारी (ता. १६) गुन्हा दाखल केला.