जुन्नर येथील हुंडेकऱ्याची 
चौदा लाखांची फसवणूक

जुन्नर येथील हुंडेकऱ्याची चौदा लाखांची फसवणूक

जुन्नर, ता. १७ : येथील हुंडेकरीचा व्यवसाय करणाऱ्यांची सुमारे चौदा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबतची फिर्याद हुंडेकरी सतीश जनार्दन ठोंबरे यांनी जुन्नर पोलिसांकडे दिली. त्यानुसार पोलिसांनी कल्याण व उल्हासनगर येथील सदगुरू ट्रेडिंग कंपनीचे संदीप कांडेकर, बबन कांडेकर व तुळशीराम कांडेकर यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. ठोंबरे हे सन २०१२ पासून जुन्नर येथे हुंडेकरीचा व्यवसाय करत आहेत. त्यांनी १७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २२ या कालावधीत शेतकऱ्यांचा कांदा व बटाटा हा शेतमाल घेऊन तो बाजार समितीमधील कांडेकर यांच्या गाळ्यावर पाठविला होता. त्याचे एकूण २४ लाख ७६ हजार ६९२ रकमेपैकी कंडेकर यांच्या कंपनीने दहा लाख ७६ हजार रुपये रोख स्वरूपात दिले होते. उर्वरित रकमेचे ‘लक्ष्मी हुंडेकरी’ या नावाने प्रत्येकी सात लाखाचे दोन चेक दिले होते. ते बँक खात्यात शिल्लक नसल्याने बँकेतून परत आले. त्यानंतर ठोंबरे यांनी कांडेकर यांना सांगितले. यावेळी त्यांनी, ‘चेक परत दे, आम्ही तुला रोख रक्कम देऊ,’ असे सांगून चेक परत घेतले. मात्र, आजपर्यंत त्यांनी कोणतेही रक्कम न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com