मुलाच्या हातातच
मोबाईलचा स्फोट

मुलाच्या हातातच मोबाईलचा स्फोट

जुन्नर, ता. १७ : वडज (ता. जुन्नर) येथील दहा वर्षाच्या मुलाच्या उजव्या हातात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यात त्याचा उजव्या हाताची बोटे व पंजास मोठी जखम झाली. त्याचा पंजा वाचवण्यात तीन तासांच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांना यश मिळाले.
अरबाज नसरुद्दीन शैख, असे जखमी बालकाचे नाव असून, मंगळवारी (ता. १६) दुपारी अरबाज याने घरातील जुन्या मोबाईलची बॅटरी काढून तिला लोखंडी पट्टी लावली व दोन वायरी जोडून इलेक्ट्रिक बोर्डच्या सॉकेटमध्ये लावल्या आणि बटन चालू केले. त्याचक्षणी बॅटरीचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. त्यात त्याच्या उजव्या हाताच्या पंजाची तर्जनी आणि करंगळी तुटून पंजा रक्तबंबाळ झाला. तसेच, छातीला मोठी जखम झाली. जखमी अवस्थेत त्यास जुन्नर येथील मोकाशी हॉस्पिटल येथे आणण्यात आले. तेथे डॉ. आर. आय. मोकाशी यांनी प्लास्टिक सर्जरी केली. त्यामुळे त्याचा उजव्या हाताचा पंजा वाचविण्यात यश मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com