जुन्नर तालुक्यात 
७० टक्के मतदान

जुन्नर तालुक्यात ७० टक्के मतदान

जुन्नर, ता. १८ : पोटनिवडणूक होत असलेल्या पाच ग्रामपंचायतीच्या पाच जागांसाठी गुरुवारी (ता. १८) शांततेत मतदान झाले. एकूण एक हजार ६८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ७०.८२ टक्के मतदान झाले. मतमोजणी शुक्रवारी (ता. १९) जुन्नर येथे होणार आहे.
इंगळूण, दातखिळेवाडी, गोद्रे, चावंड, मंगरूळ येथील प्रत्येकी एका जागेसाठी सरळ लढत होत असून, एकूण पाच जागांसाठी दहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. हातवीज, राजूर, अलदरे, उच्छिल, येणेरे, पूर, आपटाळे, नळवणे, वारूळवाडी, पारगावतर्फे मढ येथे प्रत्येकी एक, अशा दहा ग्रामपंचायतीच्या एकूण तेरा जागा बिनविरोध झाल्या असल्याचे निवडणूक नायब तहसीलदार सुधीर भालेराव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com