जुन्नर पोटनिवडणुकीतील 
विजयी उमेदवार जाहीर

जुन्नर पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार जाहीर

जुन्नर, ता. १९ : जुन्नर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या १९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी व बिनविरोध निवडून आलेले उमेदवार शुक्रवारी (ता. १९) मतमोजणीनंतर जाहीर केल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार सुधीर वाघमारे यांनी दिली.
सदस्याचे निधन, राजीनामा, सदस्यत्व रद्द झाल्याने तसेच नाम निर्देशन पत्र न आल्याने रिक्त झालेल्या तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी निवडणूक झाली. यात वानेवाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सर्व सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, उमेदवारी अर्ज न आल्याने सर्व जागा रिक्त राहिल्या. तसेच, उर्वरित २६ ग्रामपंचयीच्या रिक्त सदस्यपदाच्या जागा उमेदवारी अर्ज न आल्याने रिक्त राहिल्या असून, येथे पुन्हा पोटनिवडणूक जाहीर होईल, असेही वाघमारे यांनी सांगितले.
पाच ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी सरळ लढत झाली. यातील विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे : मंगरूळ : सविता प्रवीण खराडे, दातखिळेवाडी : जयश्री भरत भालेकर, चावंड : आशा सोमनाथ शिंगाडे, इंगळूण : संगीता विलास मुद्गुन, गोद्रे : मीरा भीमा रेंगडे. अकरा ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडून आलेले १४ उमेदवार पुढीलप्रमाणे : हातवीज : राहुल सोमा सुपे, उषा दारकू पारधी, मीना विलास भलचिम. राजूर : संगीत पांडुरंग पठारे, सविता प्रदीप मुंढे. अहिनवेवाडी : गोरक्षनाथ जाधव. अलदरे : नामदेव तुकाराम घोगरे. उच्छिल : उषा प्रवीण आढारी. येणेरे : रूपाली किशोर घोगरे. पूर : सीताबाई दामोदर चिमटे. आपटाळे : संगीता सुनील साबळे. नळवणे : पल्लवी नवनाथ गंगे. वारूळवाडी : मीना संतोष वारुळे. पारगावतर्फे मढ : भरती प्रकाश चकवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com