जुन्नर प्राथमिक आरोग्य केंद्रातील
रुग्ण संख्येत वाढ : डॉ. गुंजाळ

जुन्नर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण संख्येत वाढ : डॉ. गुंजाळ

जुन्नर, ता. २९ ः जुन्नर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत भरीव वाढ झाली असल्याचे पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी सांगितले.
प्रामुख्याने कोविड काळात लोकांचा सरकारी रुग्ण व्यवस्थेवर विश्वास निर्माण झाला आहे. तालुक्यातील आरोग्य केंद्रांत डॉक्टरांची असणारी उपस्थिती, औषधांची उपलब्धता, सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या मोफत आणि उपकेंद्रात देखील समुदाय वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक यामुळे बाह्यरुग्ण, आंतररुग्ण संख्या वाढली आहे. याचबरोबर प्रसूतीच्या संख्येत देखील वाढ झाली असल्याचे डॉ. गुंजाळ यांनी सांगितले.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतील २०२२-२३ वर्षात वाढ झालेली रुग्णसंख्या तर कंसात २०२१-२२ मधील नोंद झालेली रुग्णसंख्या.
बाह्यरुग्ण संख्या दोन लाख ६० हजार ३५७ (१, ७६, २६३). उपकेंद्र दोन लाख २५ हजार १८ (९३, १४०), आंतररुग्ण संख्या १३ हजार १४५, (९, ५३९). प्रसूतीसंख्या एक हजार १९९ (१०६५). या आकडेवारीवरून तालुक्यातील शासकीय रुग्ण सेवेचा लाभ घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे स्पष्ट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com