वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू
वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

जुन्नर, ता. १७ : जुन्नर-आपटाळे रस्त्यावर पंचलिंग मंदिराजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला.
आदिवासी भागातील चावंड (ता.जुन्नर) येथील ललेश ऊर्फ ललित नारायण उतळे (वय २८) व दीपक गणपत शेळकंदे (वय ३५) हे दोघे शनिवारी (ता.१६) कामावरून दुचाकीवरून घरी जास्त असताना रात्री ८.३० वाजता हा अपघात झाला. यामध्ये ललित याचा जागीच मृत्यू झाला तर दीपक याचा पुणे येथे उपचार सुरू असताना रविवारी (ता.१७) सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत.

05785, 05786