महात्मा फुले सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रकाश होले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा फुले सोसायटीच्या 
अध्यक्षपदी प्रकाश होले
महात्मा फुले सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रकाश होले

महात्मा फुले सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रकाश होले

sakal_logo
By

खळद, ता. ९ : खानवडी (ता. पुरंदर) येथील महात्मा फुले सोसायटीच्या अध्यक्ष पदासाठी प्रकाश विठ्ठल होले यांचा तर उपाध्यक्षपदासाठी ताराचंद जयवंत नेवसे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सोसायटीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमरीन बागवान यांनी तर त्यांच्यासोबत सोसायटीचे सचिव गणेश दीक्षित यांनी काम पाहिले.
यावेळी सोसायटीचे सर्व सभासद उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश होले व उपाध्यक्ष जयवंत नेवसे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी सरपंच रवींद्र फुले, सदस्य विजय होले, माजी ग्रामपंचायत सरपंच रामदास होले, नितीन होले, निळुंज गावचे सरपंच गणेश होले, नवनाथ होले, काका होले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b00997 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top