‘पुरंदर मिल्क’चे ‘आनंदी फ्रोझन ट्रीट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पुरंदर मिल्क’चे ‘आनंदी फ्रोझन ट्रीट’
‘पुरंदर मिल्क’चे ‘आनंदी फ्रोझन ट्रीट’

‘पुरंदर मिल्क’चे ‘आनंदी फ्रोझन ट्रीट’

sakal_logo
By

खळद, ता. १० : खळद (ता. पुरंदर) येथील पुरंदर मिल्क अॅंड मिल्क प्रॉडक्ट यांच्या वतीने नव्याने सुरू केलेल्या ‘आनंदी फ्रोझन ट्रीट’ या नवीन दालनाचे उद्‍घाटन सासवडच्या माजी नगराध्यक्षा व पुरंदर मिल्कच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार संजय जगताप, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे, पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते, जेजुरीच्या नगराध्यक्ष वीणाताई सोनवणे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कामथे, राजेंद्र पाटील, सविता पाटील, तानाजी जगताप, विराज काकडे, राजेंद्र काकडे, प्रदीप पोमण, शंकरराव कामथे, कैलास कामथे, चंद्रकांत कामथे, नंदकिशोर कामथे, सुरेश रासकर, राजेंद्र मांढरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, ‘‘स्व. चंदुकाका जगताप यांनी पुरंदर तालुक्यामध्ये सहकाराची चळवळ उभी करत तालुक्यातील अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळून देण्यासाठी अनेक वाटा निर्माण केल्या आहेत. त्याच माध्यमातून पुरंदर मिल्कच्या माध्यमातून राजवर्धिनी जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या नवीन दालनाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार आहे.
प्रदीप पोमण यांनी प्रास्ताविक केले. राजवर्धिनी जगताप यांनी आभार मानले.

आनंदी दूधचा विस्तार करत असताना आनंदी फ्रोझन ट्रीटच्या माध्यमातून येथे दही, दूध, ताक, तूप, आइस्क्रीम, पनीर, ग्रीनपीस, सीताफळ-आंबा पल्प वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केले असून, लवकरच या पुरंदरच्या ब्रॅंडच्या संपूर्ण राज्यभर महामार्गालगत शाखा करण्याचा कंपनीचा मानस आहे.
- राजवर्धिनी जगताप, चेअरमन, पुरंदर मिल्क
PNE22S63240

Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b00998 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top