
कानिफनाथ ढोल-लेझीम पथकाचा सन्मान
खळद ता. १० : येथे (ता.पुरंदर) शंभूमहादेवाचा मंगळवारी (ता.१०) यात्रा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या ढोल लेझीम, झांज पथक स्पर्धेमध्ये बोरगाव येथील कानिफनाथ सेवा मंडळास सन्मानित करण्यात आले. यावेळी बोरगावमधील जीर्णोद्धार करण्यात येत असलेल्या मंदिरासाठी खळदकरांनी निधी उपलब्ध करून दिला.
यात्रेमध्ये पुरंदर, भोर, वेल्हा, हवेली, दौंड तालुक्यातून आलेल्या विविध ढोल, लेझीम, झांझ पथकांनी सहभाग घेतला होता. रात्री एक ते पहाटेपर्यंत ढोल लेझीम पथक स्पर्धा पार पडली. स्पर्धेत भैरवनाथ मंडळ बहिरवाडी, जानाई देवी मंडळ कोंडकेवाडी, पारेश्वर मंडळ पारगाव, कातरभाई मंडळ चिव्हेवाडी यांना तर झांझ पथक स्पर्धेत
स्वाभिमान युवा प्रतिष्ठान डाळिंब, भगवान सेवा मंडळ पानवडी यांना ढाल व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
सोमवारी (ता.९) मुख्य यात्रेच्या एक दिवस आधी रविवारी भैरवनाथाची यात्रा पार पडली. या निमित्ताने अभिषेक महापूजा, नाथांची पालखी मिरवणूक काढली तर सोमवारी गावातील देवतांना अभिषेक महापूजा केली. सायंकाळी पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी सकाळी बाबूराव कांबरेकर यांचा तर रात्री आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता झाल्याचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक तथा गावचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी सांगितले.
उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सरपंच कैलास कामथे, बबनराव कामथे, चंद्रकांत कामथे, नंदकिशोर कामथे, सुरेश रासकर, योगेश कामथे, उत्तम कामथे, संजय कामथे, गणेश कामथे, रमेश कामथे, विलास कामथे, सुदाम कामथे, गंगाराम कामथे, बाळासाहेब फुले, शिवाजी कामथे, अनिल कामथे, तुळशीराम रासकर, योगेश वि.कामथे, संदीप यादव, भाऊसाहेब कामथे, दशरथ कादबाने, संभाजी कामथे, तानाजी कामथे, गोरख कादबाने, महेश रासकर यांच्यांसह अनेकांनी सहकार्य केले.
63320
Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b01002 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..