
मनीषा, पूनम ठरल्या पैठणीच्या मानकरी
खळद, ता. १६ : येथे (ता.पुरंदर) ऋणानुबंध संस्था पुरंदर व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने खेळ पैठणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यामध्ये झालेल्या विविध खेळांमध्ये येथील मनीषा रोहिदास कामथे व प्रसाद कुंभार यांनी बाजी मारत पैठणीचा मान पटकविला.
खास महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रिंग पास करणे, तळ्यात-मळ्यात, कुपनद्वारे भाग्यवान विजेते असे कार्यक्रम घेण्यात आले. यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ''गाथा नवनाथांची'' या मालिकेचे प्रमोशन करण्यात आले.
यावेळी निकिता वडावकर, कामथे साधना विकास, अरुणा तुकाराम कुंभार यांनाही वेगवेगळ्या स्पर्धेत आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन ग्रामपंचायत सदस्य नम्रता कादबाने, भाऊसाहेब कामथे, दशरथ कादबाने, योगेश कामथे, ऋणानुबंध संस्थेचे युवराज कामथे, तुषार झुरुंगे सूरज कुंभार, देवानंद भालेराव यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी मराठीचे स्वप्नील पवार यांनी केले.
या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी राबविलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद होता. यामुळे महिला आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीतून स्वतः साठी थोडा वेळ एकत्र आल्या, एकमेकींशी संवाद झाला व आपल्यातील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला याबद्दल संयोजकांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे, विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन, सभा, समारंभ असे कार्यक्रम होतातच असतात. मात्र, महिलांसाठी राबविलेला नावीन्यपूर्ण उपक्रम अधिक लोकाभिमुख आहे. यामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे. त्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले.
- सुरेश ईभाड, ग्रामस्थ खळद.
01505
Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b01006 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..