खळदमध्ये ‘एक कुटुंब एक वृक्ष’ उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खळदमध्ये ‘एक कुटुंब एक वृक्ष’ उपक्रम
खळदमध्ये ‘एक कुटुंब एक वृक्ष’ उपक्रम

खळदमध्ये ‘एक कुटुंब एक वृक्ष’ उपक्रम

sakal_logo
By

खळद, ता.१९ : खळद (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये ‘एक कुटुंब एक वृक्ष’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये एक मुखाने घेण्यात आला. यासाठी आवश्यक असणारी रोपे ग्रामपंचायत मोफत उपलब्ध करून देणार आहे.
महादेव मंदिरामध्ये ग्रामसभा पार पडली. यावेळी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांनी झाडांची जोपासना करावी या हेतूने उत्पन्न देणारी आंबा, जांभूळ यासारखी झाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या नागरिकांची घरपट्टी, पाणीपट्टी पूर्ण भरलेली आहे अशा नागरिकांना ही झाडे उपलब्ध करून दिली जातील.
ग्रामसभेला उपसरपंच आशा रासकर, सदस्य दशरथ कादबाने, भाऊसाहेब कामथे, योगेश कामथे, छाया कामथे, रोहिणी कामथे, ग्रामसेवक सुरेश जगताप, कृषी सहाय्यक स्वाती यादव, अंकुश कामथे, गोरख कादबाने आदी उपस्थित होते. यावेळी पाणंद रस्ते करणे, स्ट्रीट लाइट मागणी करणे, आरोग्य विभागाच्या योजना, रोजगार हमी योजना, कृषी विभागाच्या योजना, रमाई आवाज योजना, अपंगांसाठी घरकुल योजना राबविणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नदीपात्रातील राडारोडा काढणार

तीन वर्षांपूर्वी कऱ्हा नदीला महापूर आला होता.यावेळी कऱ्हा नदीच्या पात्राचा विस्तार गावच्या दिशेने होऊन गावात पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर आगामी धोक्याचा विचार करता नदी पात्रांमध्ये असणारा राडारोडा बाजूला करून त्याची भर गावच्या बाजूला लावण्याचा व पाण्याची साठवणूक क्षमता वाढविण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामनिधी व सीएसआर फंडांच्या माध्यमातून हे काम करण्याचे ठरले.

Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b01009 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top