कदम वस्तीमध्ये पहिल्याच दिवशी मदतीचा ओघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदम वस्तीमध्ये पहिल्याच दिवशी मदतीचा ओघ
कदम वस्तीमध्ये पहिल्याच दिवशी मदतीचा ओघ

कदम वस्तीमध्ये पहिल्याच दिवशी मदतीचा ओघ

sakal_logo
By

खळद ता. १५ : बेलसर - साकुर्डे (ता पुरंदर) येथील कदम वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांचा मदतीचा ओघ सुरू झाला आहे. येथे नवोदित मलांच्या स्वागतप्रसंगी विशाल चव्हाण यांनी ३५ हजार रुपयांची दफ्तरे देण्याचे जाहीर केले.
चेतन खामकर व उमेश गायकवाड यांनी पाच हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य व अवधूत बेलसरे यांनी ३ हजार रुपयांच्या वह्या दिल्या. तर जिल्हा परिषदेच्या वतीने मुलांना गणवेश व शालेय पुस्तके देण्यात आली. संपत कदम, गणेश गरुड, प्रियांका चव्हाण, हनुमंत कदम, भरत चव्हाण यांनी आज मुलांना खाऊ दिला.
या शाळेच्या वतीने नवोदित मुलांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्याध्यापक आनंदा जाधव, सरपंच अजित जाधव, दिगंबर कदम,बाळासाहेब काळे,विशाल पवार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर कदम,हनुमंत कदम यांच्यासह पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

अनंता जाधव व सुरेखा जाधव हे शिक्षक दांपत्य या शाळेत आल्याने या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून शाळेचा नावलौकिक संपूर्ण राज्यभर पोहोचला. अनेक गुणवंत विद्यार्थी घडले, अनेकांना पुढील शिक्षणासाठी नामांकित शाळेत प्रवेश परीक्षेतून प्रवेश मिळाला तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक प्रतीक्षेत असल्याचे चित्र आज पाहावयास मिळत आहे. याचा सर्वांना अभिमान असून या शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे बाळासाहेब काळे व सर्व उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

सूत्रसंचालन व आभार सुरेखा जाधव यांनी मानले.

गाणी लावल्याने वातावरण स्वागतमय
पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांचे रांगोळी व फुलांच्या पायघड्या टाकून त्यांचा प्रवेशोत्सव करण्यात आला. या सर्व लहानग्यांसह त्यांच्या दुसरी ते चौथीतील विद्यार्थिनींनी औक्षण करून तर दादांनी रंगीबेरंगी फुगे, फुले देऊन स्वागत केले. यावेळी सर्व परिसरात आकर्षक फुलांची सजावट व नवोदितांच्या स्वागताची गाणी लावल्याने संपूर्ण वातावरण स्वागतमय झाले होते.


01551

Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b01032 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top